EMBARGO: प्रकाशीत करू नका

खालिल स्वरूपात देखिल उपलब्ध आहे: English | Català | Deutsch | Español | Français | Italiano | Malayalam | Polski | Portuguese | Slovenian | Svenska | 简体中文 | मराठी

KDE प्रकल्प KDE 4.1.0 चे प्रकाशन करीत आहे

KDE ने Uwe Thiem समर्पीत डेस्कटॉप व अनुप्रयोग यांचा विकास केला आहे

जुलै 29, 2008. KDE प्रकल्प ने आज KDE 4.1.0 चे प्रकाशन केले. हे प्रकाशन KDE 4 श्रृंखला अंतर्गत दुसरे विशेष प्रकाशन आहे, ज्यात नविन अनुप्रयोग व KDE4 मधिल नाविन्य तऱ्हेने विकसीत गुणविशेष समाविष्ठीत आहे. KDE 4.1 हे KDE4 चे प्रथम प्रकाशन आहे ज्यात व्यक्तिगत माहिती व्यवस्थापक संकुल KDE-PIM सह इ-मेल क्लाऐंट KMail, मदत सहाय्यक KOrganizer, Akregator, RSS फीड वाचक, KNode, समाचारगट वाचक व Kontact शेल मध्ये एकत्रीत केलेले अनेक विभाग समाविष्ठीत आहे. याच्या व्यतिरीक्त, KDE 4.0 मधिल, नविन डेस्कटॉप शेल, आता साधारण वापरकर्त्यांकरीता KDE 3 शेलशी बदलविण्याजोगी स्थितीपर्यंत विकसीत केले गेले आहे. पूर्वीच्या प्रकाशन प्रमाणेच यावेळी सुद्धा अधिक वेळ फ्रेमवर्क व KDE लायब्ररी करीता दिला गेला आहे.
Dirk Müller, KDE प्रकाशन व्यवस्थापक खालिल नुरूप आकडे प्रविष्ट करतात: "KDE 4.0 पासून ते KDE 4.1 पर्यंत एकूण 20803 कमीट्स् 15432 भाषांतरन चेकइनसह केले गेले. जवळपास 35000 कमीट्स् कार्यरत शाखां मध्ये केले गेले, काहिक KDE 4.1 सह एकत्र केले गेले, त्यामुळे त्यांस मोजले जात नाही." Müller पुढे सांगतात की KDE च्या sysadmin गटाने KDE च्या SVN सर्वर वर 166 नविन खाते बनविले.